Summary of the Book
परमार्थाचे काही नियम आहेत. एखाद्या साधकाची या जन्मात पारमार्थिक प्रगती व्हायची असेल; तर त्याचा जन्मसिद्ध, कर्मसिद्ध अधिकारही तसाच असावा लागतो; असा सिद्धांत आहे.
हा अधिकार म्हणजे त्याचा पूर्वपुण्याईचा, पूर्वजन्मातील साधनेचा परिपाकच होय. हा अधिकार सद्गुरु अतींद्रिय दृष्टीने जाणतात व ‘अधिकार तैसा करू उपदेश ।’ याप्रमाणे साधकाला परमार्थाचा पथ दाखवतात. मात्र सर्वसामान्यांना, प्रारंभावस्थेतील साधकांना हा स्वत:चा किंवा दुस-याचा अधिकार कळून येणे कठीण आहे. शास्त्रसिद्धांत अशा वेळी आपल्या मदतीला येतात. यात शरीररचना, सामुद्रिक, स्वभाववैशिष्ट्ये, विचारपद्धती इत्यादी अनेक अंगांचा विचार होतो.
साधक अधिकार बोधिनी’ हा याच शास्त्रसिद्धांतांवर आधारित, प. पू. श्री. शिरीषदादांनी तयार केलेला शंभर प्रश्नांचा संच आहे. यातील सर्व प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे, यथार्थ रितीने दिलास, परमार्थाचा प्रांगणात आपण नेमके कुठे आहोत? याचा एक वास्तवाच्या जवळ जाणारा अंदाज या पद्धतीने साधकांना / मुमुक्षूंना नक्कीच येऊ शकेल.