Jabardast pustak. Wishay khol kela.
चारुदत्त लोणारी
17/02/2023
ह्या पुस्तकाच्या खूप कमी प्रती आहेत. एवढे दर्जेदार पुस्तक मराठीत अस्तित्वात आहे ही आश्चर्याची बाब आहे. मित्राकडून या पुस्तकाबद्दल कळले. सुमेध सरांनी ह्यानंतर कोणती कादंबरी लिहिली असेल तर कृपया इथे कमेंट करून कळवावे.
अनिष पैठणे
02 Aug 2023 05 30 AM
अजातशत्रू ही कादंबरी मराठीतल्या सर्वोत्तम ऐतिहासिक कादंबऱ्यांपैकी एक आहे. सुमेध ह्यांची व्हिजन फार आवडली. राजा कुणिक पासून अजातशत्रू होण्याचा प्रवास मस्त रेखाटला आहे. इतिहासाची तोडफोड न करता क्रिएटिव्ह लिबर्टी कशी घ्यावी हे सुमेध ह्यांच्याकडून शिकावे. ही कादंबरी दुर्लक्षित आहे. पण जो कोणी ही कादंबरी वाचेल तो सुमेध ह्यांचा फॅन होईल.
- अनिष पैठणे, बेळगाव.
वाल्मिक पगारे, संभाजीनगर
24/10/2022
खूप भारी पुस्तक होतं. अजातशत्रूवर बिग बजेट सिनेमा व्हायला पाहिजे. लेखकाला भेटायला आवडेल. पुस्तकात लेखकाचा संपर्क दिलेला नाही. सुमेध ह्यांचा मोबिल नंबर मिळू शकेल काय?
रुपाली देशमुख
06 Aug 2022 05 30 AM
मी आजवर वाचलेले मराठीतले सर्वोत्तम पुस्तक म्हणजे अजातशत्रू. ही कादंबरी वाचून लेखक सुमेध ह्यांच्या लिखाणाचं कोणीही फॅन होईल.
ही कादंबरी मी रात्री अकरा वाजता वाचायला सुरुवात केली. हातातून ठेवली गेली नाही. कादंबरी वाचत असताना अनेक ऐतिहासिक गोष्टी मी प्रत्यक्ष गुगल करून बघितल्या. त्यामुळे माझ्या वाचनाची मजा जास्तच वाढली. समजा मला अजातशत्रूचं संपूर्ण चरित्र माहिती असतं तरी सुमेधने ज्या प्रकारे कादंबरीत सुरुवात ते शेवट धुमश्चक्री दाखवली आहे ती वाचून कोणालाही मजा आल्याशिवाय राहणार नाही. रात्रभर जागून ही कादंबरी मी संपवली. लेखकाबद्दल इंटरनेटवर सर्च करून बघितलं पण फार काही सापडलं नाही. कादंबरीकार सुमेध ह्यांचं अजून लेखन वाचायची इच्छा आहे. ही प्रतिक्रिया वाचणाऱ्या कोणाला सुमेधचं अजून साहित्य माहिती असेल तर नक्की कमेंट करून कळवावं.
बाकी मराठीमध्ये वर्ल्डक्लास कादंबरी लिहिली गेली आणि ती मला अपघातानेच सापडून ती मी वाचलीसुद्धा, ह्याचा खूप आनंद आहे.
(प्रकाशकाने पुस्तक कव्हर अजून छान केलं असतं तर अजूनच छान वाटलं असतं.)