Summary of the Book
प्रत्येकाला जीवनात कोणी तरी मोठे व्हावेसे वाटत असते. पण त्यासाठी जे प्रयत्न होतात, ते तोकडे पडतात. यशापर्यंत पोचणारा मार्ग चुकीचा असतो.
स्वत:मध्ये बदल न केल्यानेही यश मिळवणे अवघड असते. म्हणूनच यशाची सूत्रे काय आहेत, याचे मार्गदर्शन सरश्री यांनी 'विकास नियम - आत्मसंतुष्टीचे रहस्य ' या पुस्तकातून केले आहे. मानवजन्म म्हणजे हिऱ्यांचे भांडार आहे. सजगता, चेतना, संवेदना, भावना, शरीर व बुद्धी हे आपले हिरे आहेत. विकासनियमांच्या आधारे यश साध्य होते.
ते नियम काय, विकासाचा मार्ग, अध्यात्मिक व सामाजिक, नात्यांमधील विकास, मनन, विचार करण्याचे महत्व, विकासाचा मार्ग, आत्मविकास कसा साधावा, सर्वोच्च विकास कधी होतो. विकासात आहार व आरोग्य, व्यायामाची गरज याविषयी सांगितले आहे. उत्साही, परिपूर्ण, गुणसंपन्न जीवनासाठी यातील विकासनियम समजून घ्यायला हवेत.