Summary of the Book
डॉ. दीपक शिकारपूर यांचं हे विसावं पुस्तक. संगणक क्षेत्रातील आणि विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनानं मानवी आयुष्यात कसे बदल होणार आहेत, नवीन सोयी काय होणार आहेत, याची माहिती या पुस्तकातून मिळते. 29 प्रकरणांमधून लेखक विविध शोध आणि नवी साधनं याची माहिती देतो. आज कल्पना वाटेल; पण भविष्यात प्रत्यक्षात येणाऱ्या या गोष्टी वाचताना वाचक थक्क होतो. यामुळे विषय अवघड आणि तांत्रिक असला तरी सोपी भाषा आणि प्रवाही लेखनपद्धतीमुळे वाचक पुस्तकात गुंतून जातो.