Summary of the Book
कोल्टन बर्पोची अपेन्डिक्सची इमर्जन्सी शस्त्रक्रिया करावी लागली. एखादा चमत्कार घडल्यासारखा तो त्यातूनच वाचला म्हणून त्याच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला. तरी पुढील काही महिन्यांत अशी गोष्ट घडली कि, ज्याची त्यांनी कधी अपेक्षाच केली नव्हती - ती गोष्ट खूप सुंदर आणि अलौकिक होती. त्यांचा लहानसा मुलगा स्वर्गात जाऊन परत आला, त्या सफारीचा तपशील तो सांगू लागला. चार वर्षांचासुद्धा नसलेल्या कोल्टननं आपल्या आई-वडिलांना सांगितलं कि, शस्त्रक्रियेच्या वेळी तो आपलं शरीर सोडून स्वर्गात जीझसकडे गेला होता. त्याचं ऑपरेशन होत असताना हॉस्पिटलच्या दुसऱ्या भागात त्याचे आई-वडील काय करत होते, हे सांगून त्याने आपला खरेपणा शाबीत केला. स्वर्गाच्या भेटीबद्दल तो बोलत राहिला. स्वर्गात भेटलेल्या, पण पूर्वायुष्यात कधीही न भेटलेल्या व्यक्तींनी सांगितलेल्या गोष्टी, तसेच त्याच्या जन्माआधी घडलेले प्रसंग त्यानं पुन्हा सांगितले. कोल्टन अजून वाचायलाही शिकाला नव्हता, तरी तो करत असलेली स्वर्गाची वर्णनं आणि दुर्बोध तपशील बायबलशी अगदी मिळताजुळता आहे, हे बघून त्याचे आई-वडील चकित झाले. कोल्टनच्या या विलक्षण अनुभवाविषयी लिहलंय त्याच्या वडिलांनी.