Summary of the Book
आजूबाजूचे जग आपणास कसे बघतो, घडणाऱ्या सुखद, दुःखद घटनांना सामोरे कसे जातो, यावर आपले रोजचे आयुष्य अवलंबून असते. यावर आधारीत टिपरे, कुटुंबियांचे जग दिलीप प्रभावळकर यांनी 'श्रीयुत गंगाधर टिपरे अर्थात अनुदिनी'मधून वाचकांपुढे ठेवले आहे.
एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तीन पिढ्यांतील माणसे आसपासच्या दुनियेकडे कशी बघतात, हे आपल्याला ते लिहीत असलेल्या रोजीनिशीतून कळते. आबा, शेखर, श्यामला, शलाका, श्रीलेश उर्फ शिऱ्या या पाच जणांचे स्वभावम् एखाद्या घटनेकडे बघण्याचे प्रत्येकाचे दृष्टिकोन, त्यांचे विचार, तरुण पिढीची स्वप्ने, ती पूर्ण करण्यासाठी आई-वडिलांचे प्रयत्न, ज्येष्ठांचे मार्गदर्शन याचे दर्शन होते ते कधी मिश्किल, तर कधी गंभीरपणे.
कुटुंबातील नातेसंबंध, साभोवतालच्या घटनांवरील मल्लीनाथी यातून मध्यमवर्गीयांची मानसिकता यातून व्यक्त होते. भावनाप्रधान प्रसंगातूनही वास्तवाचे भान ठेवून वास्तव व आदर्श यांतील विसंगती यातून विनोदी अंगाने मांडली आहे. आजच्या समाजाचे योग्य चित्रण या पुस्तकातुन आले आहे. दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली या पुस्तकावर आधारित मालिका लोकप्रिय झाली होती.