Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
बाबा आमटे हे एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं जगणारे अफलातून व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे जगणे आणि त्यांचे काव्यनिर्मितीसुद्धा अशीच अफलातून नि अन्वयार्थक आहे. त्यांनी स्वताच्या आणि इतरांच्या आयुष्याची रसपूर्ण कविता व्हावी यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्यामुळे त्यांची शब्दांतून अवतरलेली कविताही कालातील जीवनाशय देणारी घडली आहे. बाबांचे जीवन हे रणांगण आहे तर त्यांच्या कवितेत येणारे शब्द हे जीवनाचे रणांगण तुडवीत आलेले आहेत. प्रस्तुत पुस्तक हे बाबांवर लिहिलेल्या इतर पुस्तकांपेक्षा वेगळे नि महत्त्वाचे आहे. बाबांचे अफलातून व्यक्तिमत्त्व, कर्तृत्व आणि त्यांची तितकीच अफलातून काव्यनिर्मिती नेमकेपणाने लेखक डॉ. बाळू दगडूमवार यांनी या पुस्तकात चर्चिली आहे. बाबांच्या व्यक्तिमत्वाचे लेखकाने टिपलेले पैलू हे प्रस्तुत लेखकाच्या सूक्ष्मनिरीक्षण दृष्टी आणि वाङमयीन बुद्धिमत्तेची साक्ष देणारे आहेत. सामान्यांना गूढ आणि दैवी भासणारे बाबांचे व्यक्तिमत्त्व लेखकाने सुलभतेच्या नि मानवीयतेच्या पातळीवरून उलगडून दाखवले आहे. तसेच त्यांच्या कार्याचा संदर्भ देत त्यांची कृतिकविता आस्वाद सुलभ घडवली आहे. हे या पुस्तकाचे सामर्थ्यच म्हणावे लागेल. लेखक डॉ. बाळू हे अनेक वर्षापासून बाबांशी ब आनंदवन परीवाराशी जवळून परिचित आहेत. बाबांच्या कार्याविषयीचे आणि त्यांच्या कृतिकवितेविषयीचे लेखकाचे आकलन अगदी वस्तुनिष्ट नि वाङमयमूल्य असलेले आहे. बाबा आमटे यांच्या व्यक्तीमततत्वाचे, कार्याचे आणि त्यांच्या काव्य्निर्मितीचे हे एकत्रित समीक्षात्मक आकलन बाबांच्या चाहत्यांसाठी आणि एकूणच मराठी वाङमयविश्वासाठी उपयुक्त ठरणारे आहे. याबद्दल लेखक डॉ. बाळू दुगडूमवार यांचे अभिनंदन केले पाहिजे!