Summary of the Book
डॉ. सीमा सोनीस यांनी लिहिलेल्या या पुस्तकात जेवणाचा डबा कसा असावा, याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये पाच विभाग करण्यात आले आहेत. बालवाडीत जाणाऱ्या छोट्या मुलांपासून ते ऑफिसमध्ये जाणाऱ्या प्रौढ मंडळीपर्यंतच्या डब्याचा आढावा यात घेतला आहे. डब्यातील भाज्या, तसेच डब्यात लिंबाची फोडही का असावी, इथपर्यंत बारीक बारीक गोष्टींचा विचार येथे केला आहे.
उपवासाच्या पदार्थांचा डबा, तसेच महिलांनी डबा कसा न्यावा, गरोदरपणाच्या काळात डब्यात कोणते बदल करावेत, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. डब्यात भाज्या व सॅलडमध्ये काय असावं, आहारशास्त्रीयदृष्ट्या कोणत्या गोष्टी किती उपयुक्त आहेत, त्या कशा खाव्यात, याबद्दलची सविस्तर माहिती या पुस्तकात आहे. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात डबा ही बाब अपरिहार्य ठरत आहे, त्यामुळे तो व्यवस्थित कसा न्यायचा, ते या पुस्तकांमुळं कळतं.