'जनरेशन गॅप' हा शब्द नव्या व जुन्या पिढीसंदर्भात वापरला जातो. दोन्ही पिढ्यांमध्ये विचारांचे अंतर हे असणारच आहे. पण अनेकदा वृद्धांचा कुरबुर स्वभाव, सतत अनाहूत सॅले देणे यामुळे गैरसमजाचे 'गॅप ' वाढत जाते. हे टाळून 'सेकंड इनींग्ज ' प्रसन्न, आनंदी कशी करता येईल याबद्दल रोहिणी पटवर्धन यांनी 'आनंदस्वर ज्येष्ठांसाठी ' मधून सहज, सोपे मार्गदर्शन केला आहे. वृद्धांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठीचे प्रॅक्टिकल बुक कसे' या पुस्तकाचे वर्णन लेखिकेने केले आहे. साठीनंतर समृद्ध आयुष्य जगण्यासाठीची 'passion ' या शब्दातून स्पष्ट केली आहे. वृद्धवैद्यकशास्त्र आणि वृद्धकल्याणशास्त्र याची माहिती, ज्येष्ठांसाठी जादूचा दिवा ठरणार मोबाईल फोन वापर, ज्येष्ठ नागरिक संघाची आवश्यकता , जेष्ठ व एकट्या स्त्रियांचे प्रश्न , समाजकार्यात झोकून देणे, ज्येष्ठांना मदत करणे , वृद्धाश्रमांची गरज, त्यांचा निवड कशी करवावी, परदेशी राहणाऱ्या मुलाच्या पालकांच्या समस्या , मृत्यूला स्वीकारण्याची तयारी व त्याआधी मृत्युपत्र तयार करणे आधी सर्व गोष्टींवर यात मार्गदर्शन केले आहे. जोडीला उदाहरणेही दिली असल्याने ते मुद्दे अधिक जवळचे वाटू शकतात .
‘आनंदस्वर ज्येष्ठांसाठी’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5146929103394823148