Summary of the Book
आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञान यांचे आहे. या दोन गोष्टींच्या जोरावर जगाने मोठी भरारी मारली आहे. प्रगतीच्या वाटा नव्याने निर्माण झाल्या आहेत. भौतिक सुखे पायाशी आहेत, पण मनशांती मात्र हरवत चालली आहे. रोजच्या धावपळीत, स्पर्धेत शारीरिक व मानसिक स्वाथ्य राखणे आवश्यक आहे. ते कसे राखावे, परिणामकारक साधना कशी करावी, याचे मार्गदर्शन डॉ. कृष्णदेव गिरी यांनी ‘तणावमुक्त आरोग्य’मधून केले आहे. पोलिस खात्यात असलेले डॉ. गिरी हे उत्तम खेळाडू आहेत. योग, निसर्गोपचार, शरीरशास्त्र याचा त्यांचा अभ्यास आहे. संरक्षणशास्त्रातही ते निपुण आहेत. सर्वसामान्य माणसाचे जीवन स्वास्थ्यपूर्ण, तणावमुक्त व आनंदायी करण्यासाठी काय करावे, याची माहिती त्यांनी या पुस्तकातून दिली आहे.