Summary of the Book
‘साधना’चा दिवाळी अंक वेग आणि वेध या विषयाला वाहिलेला आहे. सुरेश द्वादशीवार, ज्ञानेश्वर मुळे, दिलीप प्रभाकर जोशी, विवेक सावंत, ज्योती पाटील, नीळकंठ रथ, अभय टिळक यांचे लेख हे या अंकाचे वैशिष्ट्य. दादाभाई ते मनमोहन सिंग या द्वादशीवार यांच्या लेखात देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात झालेल्या बदलांचा शोध घेताना महात्मा गांधी हेच अजूनही सामान्यांचे प्रतिनिधी कसे राहिले आहेत, याचा मागोवा घेण्यात आला आहे, तर नागरीकरणाचे आव्हान पेलणार्या भारतातील शहरी बदलांचा वेध अभय टिळक यांनी घेतला आहे. मनात होणारे बदल आणि तरुणाईचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावरील ज्योती पाटील यांचा लेख जसा वाचनीय आहे, तसाच विवेक सावंत यांचा शिक्षणक्षेत्रातील संगणकीकरणाबद्दलचा लेख अतिशय मननीय आहे.