Summary of the Book
रोजच्या जीवनात आपला अनेकांशी संपर्क येतो. त्यातील काही जण आपले मार्गदर्शक असतात, काही टीकाकार, काही द्वेष करणारे व काही प्रेम करणारे. त्यांच्या आठवणी कायम मनात घर करून राहतात. अशा काही व्यक्तिरेखा चंद्रकांत पाटील यांनी ‘चौकटीबाहेरचे चेहरे’मधून रेखाटल्या आहेत. यातील बहुतेक व्यक्ती साहित्य क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यांचे व्यक्तिचित्रण यात आहे. यात फक्त गुण, कौतुक नाही, तर दोषांसह संबंधितांच्या वैशिष्ट्यांचे विश्लेषण केले आहे. म्हणूनच हे चेहरे चौकटीतील असूनही चौकटीबाहेरचे वाटता.