Summary of the Book
इतिहासातील सर्वात बुद्धिमान मनुष्य कोण ? असा प्रश्न निर्माण झाला , तर सर्वांचं एकच उत्तर असेल , अल्बर्ट आईन्स्टाईन ! वेगवेगळ्या युगांतील लोकांनी त्यांना शताब्दी पुरुष , सर्वकालीन महान शास्त्रज्ञ , जीनियस अशा कितीतरी उपाधी देऊन त्यांचा गौरव केला . आईन्स्टाईन यांनी आपल्या सिद्धांतांव्दारे आणि संशोधनव्दारे विज्ञानाचा चेहरामोहराच पार बदलून टाकला . अतिशय सामान्य मनुष्यदेखील श्रम , हिंमत आणि ध्यास यांच्या साहाय्याने अनोखं यश प्राप्त करू शकतो . शिवाय लौकिक मिळवून विश्वातील असामन्य व्यक्तींच्या अग्रगण्य यादीत आपलं नाव समाविष्ट करू शकतो.
सापेक्षता सिद्धांत आणि E =MC२ या द्रव्यमान ऊर्जा समीकरणामुळे आईन्स्टाईन संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत . त्यांना सिद्धान्तिक भौतिकशास्त्रात विशेषत: प्रकाश विद्युत प्रभावाच्या नियमांचा शोध लावल्याबद्दल इ. स. १९२१ मध्ये विश्वातील सर्वोच्च मानला जाणारा ' नोबेल पुरस्कार 'देऊन गौरविण्यात आलं.
मनुष्य एखादं छोटं काम जरी करत असेल , तरी त्याने ते अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने करायला हवं , असं त्यांचं प्रांजळ मत होतं .
आपणदेखील एका महान , विलक्षण शास्त्रज्ञाच्या जीवनाचं अवलोकन करून त्यातून प्रेरणा घ्यायला हवी , त्यासाठी प्रस्तुत पुस्तक वाचायलाच हवं ...