Hard Copy Price:
25% OFF R 260R 195
/ $
2.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
"गोठलेल्या वाटा', "गौरी, गौरी कुठे आलीस?' यासारख्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या शोभा चित्रे यांच्या पुस्तकांनंतर आता "मेहता पब्लिशिंग हाऊस'तर्फे येणारी "पानगळीच्या आठवणी' या गाजलेल्या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती. म्हटलं तर हे आत्मकथन आहे. त्यातील कथानकाला विशिष्ट काळाच्या, प्रसंगांच्या मर्यादा आहेत. हे शोभा चित्रे यांच्याच जीवनातले प्रसंग जरी असले तरी ते त्यांच्याच कुटुंबापुरते सीमित आहेत. मध्यमवर्गात जन्मलेली लेखिका अमेरिकेतल्या जीवनाचा स्वीकार करून जगत असताना, बदलत्या काळाबरोबर विविध अनुभवांना तोंड देत असताना बदलली नाही ती फक्त एकच गोष्ट. ती म्हणजे मनावरचे मध्यमवर्गीय संस्कार. लग्नानंतरच्या आयुष्यात निर्माण झालेले नवे भावबंध, नातीगोती, मनावरचे मध्यमवर्गीय संस्कार जोपासताना परदेशातील आयुष्यात वाट््याला आलेली अटळ धडपड ही त्यांची वौयक्तिक जरी असली तरी ती वाचकाला प्रातिनिधिक वाटेल. पण त्याही पलीकडे, जीवनातल्या एका विशिष्ट अनुभवावर लिहिता-लिहिता त्यांचं भावविश्व इतकं विस्तारलं जातं की, तो सीमित अनुभव जणू सर्वस्पर्शी बनतो आणि वाचकाला अंतर्मुख करून टाकतो. "पानगळीच्या आठवणी' ही प्रत्येकाने आवर्जून वाचावी, अशी भावनाप्रधान साहित्यकृती. जीवघेण्या विलक्षण अनुभवाचा वेध घेत सांगितली जाणारी ही प्रांजळ कथा हृदय हेलावून सोडते, हे नि:संशय.