Summary of the Book
श्री - मांगल्याचे प्रतीक. आदिशक्तीचे त्रिगुणात्मक रूप तर ललितामहात्रिपुरसुंदरीचे दिव्य, तेजोमय स्वरूप !
'ललित' नावाची व्यत्पत्ती पदमपुराणांमध्ये अशी आहे- 'लोकंतीत्य ललते ललिता तेन चोच्यते।' - अखिल ब्रह्मांडापेक्षाही अधिक शोभायमान जी आहे ती 'लालित्य होय. तर अखिल ब्रम्हांडाला प्रकाशमान करणारे दिव्य तेज, प्रखर ऊर्जाशक्ती जिच्यातून प्रसृत होते ती ' अम्बिका ' होय .
'श्रीललिताम्बिका' -अखिल ब्रह्मांडात सामावलेल्या दिव्यऊर्जाशक्तीचे प्रकटीकरण व विसर्जन तिच्यातूनच होत असते. हेच दिव्यऊर्जाशक्तीतत्व आपल्यामध्ये कुंडलिनीशक्तिरूपात अंतर्भूत आहे. श्रीचक्र हे ब्रह्मांड व मानवी शरीराचे प्रतीक मानले जाते. श्रीचक्रच्या पमध्यबिंदूवर 'श्रीललिताम्बिका'विराजमान आहे. तसेच कालचक्र तिच्या हातात आहे, युगानुयुगे गतिमान असणाऱ्या कालचक्राची स्वामींनी , अधिष्ठांची ! कालचक्रातीत असणारी ती योगिनी , मातृका, माता , सखी , सहचारिणी असा अनेक रूपांत आपल्यामध्ये व्यक्त , प्रकट होत असते. तीच शिवाची शक्ती ! सृष्टीउत्पत्तीचे रहस्व, आदीशक्तीचे स्वरूप, अष्ट्मातृका, दशमहाविद्या, चाऊसष्ट योगिनी याविषयीच्या अध्यात्मिक, तात्विक , वैज्ञानीज चर्चेसमवेत 'श्रीललिताम्बिके 'च्या शूर्याच्या रोमहर्षक गाथा सांगताहेत षोडशी , ललिता आणि भैरवी ....
मातृत्वाचा आदर करताना आपण अखिल स्त्रीशक्तीचा गौरव करण्याचे मात्र सोयीस्कररीत्या विसरतो. 'स्व' चिंतनामामध्ये रूपांतर करतानाच प्रत्येकातील आत्मतत्व जागृत करायला लावणारी सखोल संशोधन व प्रदीर्घ व्यासंगातून निर्मिलेली , दुर्मिळ माहितीचा खजिना असलेली लालित्यपूर्ण कलाकृती.