Summary of the Book
विज्ञान म्हणजे क्लिष्ट परिभाषा आणि किचकट आकडेमोड! विज्ञान म्हणजे अगभ्य आकृत्या नि अगडबंब सूत्रांचं जंजाळ! या रुढ समजुती मोडीत काढणारं हे पुस्तक आहे. विज्ञानाच्या मजेशीर हसर्या भागावर प्रकाश टाकणारं. हलक्या-फुलक्या भाषेत लिहिलेलं. विज्ञानाकडे खेळकर नजरेनं बघणारं. कॉम्प्युटरचा बिनडोकपणा, भविष्यात घडणारे विनोद, भारतीय राजकारणातले अफलातून व्हायरस, अमेरिकेतल्या अंधश्रद्धा आणि आचरट संशोधन असल्या धमाल गोष्टींनी भरलेलं.
यात शास्त्रज्ञांच्या बावळटपणाच्या आख्यायिका आहेत, तसेच बनवेगिरीचे किस्सेही. इथं कवितेतलं विज्ञान आहे आणि विज्ञानातलं काव्यसुद्धा.
एका अंगाला काव्य आणि दुसर्या अंगाला विनोद यांच्या साथीने रंगवलेली काव्यशास्त्रविनोदाची ही मैफलच आहे. मराठीतलं अशा प्रकारचं हे पहिलचं पुस्तक.