Summary of the Book
जागतिक पटलावर विविध क्षेत्रांमध्ये कर्तबगारी दाखविलेल्या ३२ स्त्रियांचे व्यक्तिचित्रण अशोक चिटणीस यांनी या पुस्तकात केले आहे. 'इराक'ची निर्मिती आणि अरेबियाची अनभिषिक्त साम्राज्ञी गरटूड बेल हिच्या परिचयाने या लेखसंग्रहाची सुरुवात होते.
अर्जेंटिनातील राजकारणपटू एव्हिटा पेरॉन, ऑपेरा गायिका मारिया काळास, पहिली वॉर फोटोग्राफर मार्गारेट बोर्क -व्हाईय, धाडसी पत्रकार नेली ब्लाय, नेमबाज अॅनी ओकली, चीनची सम्राज्ञी वू झाओ आदी महिलांच्या कार्यकर्तुत्वाचा परिचय होतो.
दोन नोबेल परितोषिके मिळविणारी पहिली महिला शास्त्रज्ञ मादाम मेरी क्युरीचाही नव्याने परिचय होतो. जपानी सामुराई महिला इटागाकी, हात्सू - जो, मियाजिनो आणि टोरा गोझेन यांच्याविषयी वेगळी माहिती मिळते.