Summary of the Book
मनोहर सप्रे व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेतच. त्याचबरोबर त्यांचा वाचनाचा व्यासंगही आहे. आतापर्यंत त्यांच्या पत्रसंग्रहाची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्याचबरोबर "जरा हसा की' हा व्यंगचित्रांचा संग्रही प्रसिद्ध झाला आहे. त्या पुस्तकाच्या आठ आवृत्त्या निघाल्या आहेत. व्यंगार्थी हे नवे पुस्तक त्यांच्या व्यंगचित्रांचा संग्रह आहे. त्यांनी या पुस्तकात लिहिलेले मनोगत व्यंगचित्रे कशी पाहावीत आणि त्यातून काय घ्यावं, याबद्दल नेमकं मार्गदर्शन करतं. दैनंदिन जीवनातील विसंगती आणि राजकारण्यांचे उद्योग यावर कधी बोचरी, तर कधी मिस्कील टिप्पणी करणारी ही व्यंगचित्रे मन प्रसन्न करतात. "असे एकेक अर्क' या सदराखालची आठ माणसे अफलातून आहेत.