Summary of the Book
भारतात परंपरागत अशा अनेक अनेक व्यायाम पद्धती रूढ आहेत. त्यापैकी काही व्यायामपद्धतींचा प्रचार व विकास झाला;
परंतु त्यामानाने सूर्यनमस्कार या सर्वांगसुंदर व्यायाम पद्धतीचा प्रचार वा प्रसार झाला नाही, सूर्य नमस्कार ही एक
अशी व्यायामपद्धती आहे की ज्यात शारीरिक, मानसिक, व अध्यात्मिक विकास यांचा सुरेख संगम करण्यात आला आहे.
व्यायामातून उपासना फक्त सूर्यनमस्कारातच साधली जाते..
धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थाचे यथार्थ सेवन करण्यासाठी आरोग्य सर्वात महत्वाचे आहे.औंधच्या महाराजांनी
खऱ्या अर्थाने सूर्यनमस्काराचा व्यायाम म्हणून प्रचार व प्रसार केला. त्यांनी अनुभवाने सूर्यनमस्कारांचे महत्व लोकांना
पटवून दिले. सूर्यनमस्कारातयोगासने वा प्राणायम यांची गुंफण करण्यात आली आहे.त्यामुळे शारीरिक, मानसिक
आरोग्य सुधारण्याबरोबरच त्यांचा विकासही होतो..