Summary of the Book
भ्रष्टाचाराच्या किश्शांची आणि टेबलाखालच्या दुनियेची सैर घडवणारी 'टेबलाखालचे जग' ही कव्हरस्टोरी आणि चपखल व्यंगचित्रे, सोबत प्रकाश आमटे, दाजी पणशीकर, ब्रिजेश मराठे आदी मान्यवरांनी मांडलेले विचार हे या अंकाचे वेगळेपण. मधु मंगेश कणिर्क, मल्लिका अमरशेख, प्रतिमा इंगोले, चंदकांत भोंजाळ आदी मान्यवरांच्या कथा, कविता तसेच बालकथाही यात आहेत.
विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींचा वारसा पुढे चालू ठेवणाऱ्यांचे मनोगत, 'एनजीओ' संस्कृतीचा घेतलेला आढावा, लोकमान्य टिळकांच्या 'गीतारहस्या'ची यू.म. पठाण यांनी केलेली मीमांसा असा वाचनीय मजकूर अंकात आहे.