Summary of the Book
कै. डब्ल्यु. आर. उर्फ नानासाहेब तळवलकर यांचे आत्मचरित्र
नियतीने नानासारख्या सरळ स्वभावाच्या माणसाच्या जीवनात भरभरून नाट्य ओतले. त्या सर्व संघर्षात आणि यशापयशांत नानांची वृत्ती सदैव निरागस राहिली. माणसाच्या आणि जीवनाच्या चांगुलपणावरचा त्यांचा विश्वास अभंग राहिला. ‘जेथे जातो तेथे’ मला चांगली माणसेच सांगाती लाभली आणि म्हणून आपणाला जीवनांत यश मिळत गेले असे नानांचे सूत्र असे.
अष्ट्याला वासुदेव तळवलकर बडोद्यास जाऊन शिकला, विरमगामला कामाला लागला. व्यवसायानिमित्त इंग्लंडला गेला आणि तेथून जर्मनीत जाऊन हिंदी क्रांतिकारकांच्या गटाचे काम सांभाळू लागला. तेथे असताना आणि मायदेशी परतल्यावर त्यांनी स्लेट पाट्या, कॉफी, स्टेनलेस स्टील पासून किर्लोस्कर व ओगले यांच्या उत्पादनांपर्यंत अनेक वस्तूंची विक्री केली. त्यामध्ये मेहनत व सचोटी यांच्या बळावर फार मोठे नाव मिळवले.
व्यक्तिगत जीवनांत, नानांच्या दुसऱ्या, जर्मन पत्नीने भारतात येऊन केवळ नानांनाच भक्कम आधार दिला नाही तर राष्ट्रीय चळवळीतही त्या सहभागी झाल्या. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर, प्रथम पत्नीबरोबर नानांचा 40 वर्षे फेर संसार झाला. या संपूर्ण काळांत नाना आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी झटत राहिले.
अशा एका साध्या माणसाची ही अद्भुत, रोमहर्षक आत्मकथा !