Summary of the Book
चित्रपट आणि भावसंगीताचे एक अखंड युग ज्यांच्या नावाने कोरले ते नाव म्हणजे लता मंगेशकर ! भारतरत्न तर त्या आहेतच, पण सुरांवर प्रेम करणाऱ्या विश्वाच्या त्या हृदयरत्न आहेत !
लतादीदी, मीनाताई, आशाताई, उषाताई आणि पं . हृदयनाथजी, या मंगेशकर भावंडांचे दुरून तरी दर्शन व्हावे असे प्रत्येक रसिकाला वाटते. माझे भाग्य हे की स्वरांच्या, संगीताच्या आणि निरुपणाच्या निमित्ताने या सर्वांचा सहवास मला मिळाला.
'स्वरमंगेश' हे पुस्तक केवळ गौरवग्रंथ नाही, तर तो एक शोधही आहे. सर्वोच्च शिखरावर विराजमान होताना, अथक ध्यासाने, परिश्रमाने प्रत्येक क्षण अर्थपूर्ण कसे केले जातात याचे कुतूहल त्यामागे आहे. लतादीदी, आशाताई यांचा जीवनविषयक दृष्टीकोन अगदी सध्या संवादातून जेव्हा व्यक्त होतो, तेव्हा आपण अंतमूर्ख होतो.
सर्व पिढ्यांच्या वाचकांना धेयसाधनेसाठी उमेद व जिद्दीचा मंत्र देईल असा हा श्ब्दानुभव !