Summary of the Book
ब्रिटिश राजवटीत काही जमातींना कायद्यानुसार गुन्हेगार ठरविले गेले. अनेक भटक्या जमातींवर त्यामुळे जन्माने गुन्हेगार असा शिक्का बसला. स्वातंत्र्याने साठी गाठली तरी तो आजही कायम आहे. फरक एवढाच, की आता त्यांना ‘विमुक्त’ असे संबोधले जाते. तरी त्यांच्या आयुष्यात ‘स्वातंत्र्य’ आणि ‘समता’ यांचा लवलेशही नाही.
जग त्यांच्याकडे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहते. त्यातून त्यांना मिळणारी वागणूक हीन असते. गरिबी, दारिद्य्र, अज्ञान, शिक्षणाचा अभाव यामुळे अशा जमातींची दैन्यावस्था आहे. त्यांचे जिणे दिलीप डिसूझा यांनी ‘जन्माने गुन्हेगार’मधून दाखविले आहे.