Summary of the Book
स्वरगंगेच्या काठावरती' म्हणजे खरंतर स्वरात चिंब भिजणं ! कुंदनलाल सैगल ते उदित नारायण आणि नूरजहाँ ते श्रेया घोषाल यांचा हा सांगितीक प्रवास. सैगलचा खर्ज, किशोरचं यॉडलिंग, दु:खाला स्वर देणारा तलत, यांचं स्मरण. नूरजहाँच्या स्वरांची खनक, शमशादचा नसल टोन, लताचा गंधार आणि गीता दत्तचा रोमान्स फुलवणारा अन् दर्द जागवणारा स्वर. स्वरांना शब्दांनी दिलेली ही मानवंदना !