Summary of the Book
एक बहुपेडी व्यक्तित्व म्हणून आप्पासंबंधी मला नेहमीच कुतूहल वाटत आलेलं आहे.
त्यांच्या स्वभावधर्मातल्या काही वैशिष्ट्यांनी मला कधी कोड्यात पाडलं, कधी आश्चर्यचकित
केलं, कधी सुखवलं, तर कधी अस्वस्थही केलं. कधी क्वचित रागही आला.
त्यांची मुलगी या नात्यानं काही अनुभव माझ्या गाठीशी होते. थोडी दूर जाऊन या लेखकातल्या
माणसाला मी जाणून घेऊ लागले.
वाङ्मयाची एक अभ्यासक या नात्यानंही मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेऊ लागले.
नुसत्या आठवणींच्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे मला दाखवावयाचे नव्हते.
त्यांच्या जीवनचरित्राशी संबंधीत परंतु अजुनी अप्रसिद्ध अशा स्मरणांची साखळीही बांधायची
नव्हती त्यांच्या साहित्याची नव्यानं समीक्षाही करायची नव्हती; पण या सर्वांमधून जाणवलेलं
आणि माझ्या मनात उमटणारं त्यांचं चित्र मला उभं करायचं होतं.
माझ्या मनात लहानपणापासून आप्पांची काही चित्रं उमटली आहेत. काही स्पष्ट आहेत, काही
धूसर. काही निकटची आहे काही दूरची. काही त्या वेळी उमटलेली- कळली होती. काही आता लेखन
करताना अचानक कळली. काहींचा अर्थ त्या त्या वेळी उलगडला होता. काहींचा नंतर उलगडला;
तर काही अजून उमगतो आहे. काही उ