Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
सर्व प्रथम ५ तारकांच्या ऐवजी ४ तरकाच का दिल्या हे सांगतो. मी विकत घेताना hard copy उपलब्ध नव्हती म्हणून e copy घेतली, आणि ती बुक गंगाच्या reader var वाचतो आहे. तो reader अगदीच प्राथमिक आहे आणि वाचताना स्क्रीन बंद झाला की परत पहिल्या पानावर येतो.
असो. पण हे पुस्तक एक हिराच म्हणायला पाहिजे. माननीय पारसनीस यांनी जी मेहनत केली आहे आणि ज्या प्रकारे विषय मांडला आहे त्यास खरोखरच तोड नाही.
राणी साहेबांनी आणि इंग्रजांनी लिहिलेले खलिते, निर्णय नामे इत्यादी पुराव्यासह दिले आहेत. ते वाचताना त्यांच्या मानसिकतेची पूर्ण कल्पना येते.
अनेक ठिकाणी ओव्या, श्लोक आणि छंद quote केले आहेत. मला ते सर्वच कळत नाहीत पण त्यामुळे लेखकाची सुंदर लेखन शैली लक्षात येते.
प्रत्येक इतिहासप्रेमी व्याकित्ने हे पुस्तक वाचावे आणि यातील अनेक राजकीय आणि धार्मिक मुद्द्यांचा आपल्या जीवनात उपयोग करावा. तसेच राणी सहेबांसरखे रत्न या देशात घडले त्याचा सवभिमान बाळगावा.