Summary of the Book
जीवनात आनंद किंवा यश मिळवण्याचा प्रयत्न बहुतेक जण करत असतात; पण त्यांचा शोध चुकीच्या मार्गाने असल्याने पदरी निराशाच पडते. आपल्याला जे यश हवे आहे, ते मिळविण्याचा सोपा मार्ग म्हणजे आपली खरी इच्छा. ज्याप्रमाणे गुणसूत्र किंवा डीएनएही आपल्याजवळ कायम राहणार आहे, असा सल्ला देत जॅक ज्युफेल्ट यांनी 'डीएनए ऑफ सक्सेस' मधून आपल्या आतील शक्ती ओळखण्याचे रहस्य सांगितले आहे.
आपण अपयशी का होतो? यशाच्या मागील चार मुलभूत गोष्टी, शरीर, मन, हृदय यांचे यशातील स्थान आपली मुलभूत इच्छा ओळखणे, ध्येयप्रप्तीमधील अडथळे दूर करणे, मार्गदर्शकांची मदत, कौटुंबिक संबंध, आर्थिक इच्छा पूर्ण करणे, मानाचा विकास, अध्यात्मिक अस्तित्व अशा गोष्टींमधून यशप्राप्तीचा वेध कसा घेता येतो, याबद्दल यात मार्ग दाखविला आहे. याचा मराठी अनुवाद प्रसाद ढापरे यांनी केला आहे.