Summary of the Book
निशा कोत्तावार यांच्या "भारतीय खाद्य संस्कृती' या पुस्तकातून विविध राज्यांतील खाद्य संस्कृतीची माहिती देण्यात आली आहे, त्याचबरोबर तेथील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांच्या पाककृतीही दिल्या आहेत. 28 प्रकरणांमधून देण्यात आलेल्या या खाद्य प्रकारांमध्ये पारशी, जैनधर्मीयांच्याही विशेष खाद्य पदार्थांची माहिती देण्यात आली आहे.
शाकाहाराचे महत्त्व लक्षात घेऊन या पुस्तकात शाकाहारी पदार्थांचीच माहिती देण्यात आली आहे. चटणी, थालीपीठ, ठेचा, मसाला ताक अशा छोट्या छोट्या पदार्थांचाही या पुस्तकात विचार करण्यात आला आहे. केवळ पाककृती सांगणारे हे पुस्तक नसून, देशाच्या विविध भागांतील खाद्य संस्कृतीची थोडक्यात ओळख करून देणारे हे महत्त्वाचे पुस्तक आहे.