Summary of the Book
मराठी कादंबरीच्या प्रवासात राजकीय कादंबरी हा प्रकार सातत्याने नसला तरी मधून मधून काही लेखकांनी हाताळला आहे. काळाच्या प्रवाहात आपल्या लेखनातून अनेक प्रतिभावंतांनी या सत्ताकांक्षेचा, सत्तापिपासेचं चित्रण आपल्या कलाकृतींतून केल्याचं दिसून येते. पण या सगळ्या प्रवासात राजकीय कादंबरी वा राजकीय कलाकृती अशी ठळक नोंद कुठे केली जात नव्हती. राजकीय कादंबरीचा आलेख तपासून पाहता तो फारसा उंचावलेला दिसत नाही. आणि त्यामागील करणेही काहीशी स्पष्ट आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेल्या राजकीय कादंबऱ्यांची संख्या तुलेनेने हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी सीमित आहे. राजकीय स्वरूपाचे लेखन करणाऱ्या लेखिका जरी मराठीत फारशा नसल्या तरी या प्रकृतीच्या लेखनाची समीक्षा करणाऱ्या, अभ्यास करणाऱ्या काहीं अभ्यासक पुढे येत आहेत. त्यापैकी डॉ. रंजना नेमाडे या एक आहेत. मराठीतील राजकीय कादंबऱ्यांची चिकित्सा करण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच आशादायी असा आहे. त्यांनी या प्रकारातल्या जवळजवळ सगळ्याच कादंबऱ्या या संदर्भग्रथात अभ्यासासाठी घेतलेल्या आहेत. त्यांची मते त्यांनी अतिशय स्पष्टपणे मांडून या लेखनाच्या अधिक-उण्याबाजू अभ्यासपूर्ण रीतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.