Summary of the Book
संदिग्धता—मग ती, एकमेकांतील राजकारणामुळे, दोन माणसांच्या नात्यामध्ये तयार होणारी असो, वा अंतिम सत्याच्या शोधातून लक्षात येणारी—असंगताची स्तब्ध करणारी जाणीव करून देते. वरवर पाहता, आजच्या काळातल्या निपुत्रिकेची वाटणारी ही गोष्ट सहजपणे देवाच्या जन्माची, माणसातल्या गहन नात्यांची, सामाजिक आणि तात्त्विक असंगताची बनून जाते.
‘सापत्नेकराचं मूल’ मकरंद साठे यांच्या वेगळ्या शैलीतून आणि विनोदातून संदिग्धतेच्या अनेक रूपांचा अनुभव देत अंतर्मुख करते.