Summary of the Book
मानसोपचार तज्ज्ञ व संशोधक डॉ. रेमंड मूडी हे मृत्यूपश्चात जीवन या विषयावरील अधिकारी व्यक्ती आहेत. याच विषयावरील हे पुस्तक आहे. मृत्यू म्हणजे नेमकं काय, या प्रश्नाचा त्यांनी प्रारंभी वेध घेतला आहे. पुस्तकाचा दुसरा भाग मृत्यूचा अनुभव या विषयावर आहे. त्यात काही जणांच्या अनुभवाचे वर्णन केले आहे.
आवाज, अंधारा बोगदा, प्रकाशरूपी आत्मा, सीमारेषा, या अनुभवाचा आयुष्यावर झालेला परिणाम, मृत्यूबद्दलचा नवा दृष्टीकोन असे मुद्दे त्यांनी चर्चिले आहेत. तिसऱ्या भागात बायबलमधील उल्लेख, प्लेटो काय म्हणतो किंवा मृत्यूवरच्या तिबेटियन पुस्तकात काय मांडले आहे याचा मागोवा घेतला आहे. प्रश्नोत्तराचा विभागही पुस्तकात असून, या संदर्भातील शास्त्रीय व मानसशास्त्रीय स्पष्टीकरणेही दिली आहेत.