Summary of the Book
इस्लामिक दहशदवाद किंवा जागतिक जिहाद पौर्वात्य आणि पश्चिमात्य आधुनिक मानवी संस्कृतीसमोरील सर्वात मोठा धोका आहे, या गृहितकावर हा अभ्यास प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. पश्चिमात्य आणि इस्लामिक संस्कृती परस्परांशी विसंगत आहेत आणि त्या अनिच्छित काळापर्यंत एकामेकांशी झुंजत राहणार, हेच दैवाने लिहिले असेल, तर तो एका वेगळ्या संशोधनाचा विषय आहे असा दृष्टीकोन हे पुस्तक बाळगते. परिणामी हे पुस्तक असा युक्तिवाद करते कि तिसऱ्या जगातील देशांना सरकारपुरस्कृत दहशतवाद आणि छुप्या युद्धांसाठी - 'गैरसरकारी ( नॉन स्टेट ) कारकांच्या' च्या दहशतवादापासून नव्हे- सर्वात मोठा धोका आहे.
अंतिमतः जगाचे भवितव्य कड्याच्या एका टोकाला पोहचले आहे आणि परतीचे दोर कापलेले आहेत, असे हा अभ्यास सुचवत नाही. हा महाप्रलय टाळण्यासाठी अमेरिका आणि मुस्लीम देश दोघेही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. दरम्यान, गरिबांची गरज आणि श्रीमंत व सत्ताधीशांची हव यांच्यातील दरी वाढत आहे. इतिहासामध्ये पहिले असता, शांतता व न्याय, धर्म आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली श्रीमंत आणि सत्ताधीशांनीच युद्ध आणि विध्वंस करत मानवी संस्कृतीसमोर मोठी अरिष्टे आणली आहेत. पार्श्वभूमीवर, आज समोर ठाकलेला प्रश्न आहे: अमेरिका व तिच्या मित्र देशांनी 'वॉर ऑन टेरर' ही घोषणा केलेली असताना आणि त्यांचे मुस्लीम शत्रू प्रतिष्ठा आणि धर्माचे संरक्षण करत असल्याचे प्रतिपादन करत असताना, आपण हा विध्वंस रोखू शकणार आहोत का?