Summary of the Book
म्युलॉटो, गुलाम, प्रकाशाच्या प्रदेशात या अत्यंत गाजलेल्या नाट्यकृती प्रथमच पुस्तकरुपात. या नाटकांनी इतिहास घडवला. 'विश्वाच्या वांशिक आशयातील' संघर्षाला यांनी क्रांतीचे, नव्या प्रबोधनाचे बळ दिले. याचेच फळ स्वरूप आज अमेरिकेत सर्वोच्च स्थानी कृष्णवर्णीय ओबामा यांची निवड झालेली दिसते आहे. पहिल्याच अखिल भारतीय मराठी साहित्य विश्वसंमेलनात अमेरिकेत 'कृष्णवर्णीय नाट्यत्रयी' पुस्तकाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष डॉ.गंगाधर पानतावणे यांचे हस्ते (१४ फेब्रुवारी २००९ ) झाले. ही एक अर्थपूर्ण सांस्कृतिक घटना आहे.