Summary of the Book
कायझेन म्हणजे काय या प्राथमिक प्रश्नासह त्याचा वापर औद्योगिक क्षेत्रात करून जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण उत्पादन कसे घ्यावे याची माहिती लेखक विश्वास फडतरे यांनी या पुस्तकात दिली आहे. कायझेन हि जपानी कार्यप्रणाली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर या पद्धतीचा उगम झाला. या प्रणालीमुळे जपानच्या औद्योगिक क्षेत्रात भरभराट झाली.
या प्रणालीची मूळ तत्वे काय आहेत, त्यासाठी निरीक्षण शक्ती, टीमवर्कची आवश्यकता कशी असते,त्यासाठी दृष्टीकोनात बदल कसा करावा, सकारात्मक दृष्टीकोन कसा ठेवावा, आत्मविश्वासाने काम कसे करावे अशी साद्यंत महिती ते पुस्तकातून देतात. जपानमध्ये याचा वापर कसा करण्यात आला हे उदाहरणांसह स्पष्ट करण्यात आले आहे.