Summary of the Book
माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात त्यांना न्यायव्यवस्थेत आलेल्या अनुभवावर आधारित कथा आहेत. या कथा विविध प्रसंग आणि कायद्याची अंमलबजावणी यातून घडणारे नाट्य सादर करतात. माणसाला कायदा मदत करत असला तरी काही वेळा एखादा कायदा शेतकऱ्यांसाठी कसा अडचणीचा ठरू शकतो हे "माणूस आणि प्राणी‘ या कथेत वाचायला मिळते. त्याच वेळी कायद्याचा प्रभावी वापर करून सामान्यांना कसा न्याय मिळू शकतो ते काही कथांमधून प्रकर्षाने जाणवते. या सर्व लघुकथा आहेत, पण त्यातील आशय खूप महत्त्वाचा आहे. माणसांचे विविध नमुने दाखवणाऱ्या या 27 कथा लक्षात राहणाऱ्या अशा आहेत.