Summary of the Book
सतराव्या शतकातला कुप्रसिद्ध ब्रिटिश दर्यावर्दी लुटारूसर हेन्री मॉर्गन, ब्लडी मॉर्गन यानं लुटलेली ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, नेदरलँडस यासारख्या युरोपियन देशांची शुद्ध सोन्याची चलनी नाणी, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेतल्या गोरगरीब निग्रो माणसांच्या हातात खुळखुळायला लागली. या प्रकरणाचा तपास करण्याचं काम ब्रिटिश सिक्रेट एजंट जेम्स बाँडला देण्यात आलं. जेम्स बाँडच्या तपासात निष्पन्न झालं की या षडयंत्रामागे एक बलाढ्य निग्रो गुंड आहे, तो जारणमारण तंत्रविद्येतही अत्यंत प्रसिद्ध आहे, आणि त्यानं अत्यंत कल्पकतेनं निसर्गाच्याच शक्तीचा वापर करून ब्लडी मॉर्गनचा अफाट खजिना शोधून काढून त्याच्या संरक्षणाची व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि तिथून सुरू झाला एक महाभयानक संघर्ष.....