Summary of the Book
निष्कलंक चारित्र्य, स्वत:च्या लेखणीच्या वकुबाची वाजवी जाण, जे काही करायचे ते शक्यतो संसार सांभाळून करायचे अशी मनाची ठाम धारणा, कोणताच सुगंधू लपवू म्हणता लपवता येत नाही या चिरंतन सत्यावरची गाढ श्रद्धा, जिद्द, परखडपणा, पाठलाग, प्रयत्नशीलता तसेच सत्य आणि न्याय्य गोष्टींच्या रास्त लाभासाठी वाटेल ती किंमत मोजून एकाकी, निकराची झुंज देण्याचे विलक्षण मनोबळ ही गो. ना. मुसळे यांच्या निडर व्यक्तिमत्त्वाची काही वेचक वैशिष्ट्ये!
प्रवाहपतित न होता प्रवाहाविरुद्ध दंड थोपटून घट्ट उभ्या राहिलेल्या धट्ट लेखकाची ही चटकदार चरित-कथा...