Summary of the Book
एखादे दुकान, कंपनी काढली किंवा एखादा व्यवसाय सुरु केला की कालांतराने तो तोट्यात आहे की नफ्यात, यावर त्याचे भवितव्य ठरते. त्यासाठी जे पत्रक बनविले जाते. त्याला नफा-तोटा पत्रक म्हटले जाते. अजून एक आर्थिक पत्रक असते ताळेबंदाचे. ही पत्रके बनविणे अनेकांना किचकट व तांत्रिक वाटते, पण हा समज चुकीचा असल्याचे सांगत डॉ. अनिल लांबा यांनी ' मैत्री बॅलन्सशीटसोबत'मधून नफा-तोटा पत्रक आणि ताळेबंद का बनविले जातात, ताळेबंद तयार करण्याचा सोपा मार्ग, सामान्य माणसाची पद्धत. हिशोबनिसाची पद्धत याचे सखोल मार्गदर्शन केले आहे. सोपी भाषा, रोजच्या व्यवहारातील उदाहरणे, तसेच आर्थिक पत्रके कशी वाचायची, त्यांचे विश्लेषण करून व्यवसायाचे भवितव्य कसे जाणून घेता येते, याबाबतचे विवेचन सामन्यही अर्थकारणाचे जाणकार बनू शकतील.