Summary of the Book
बोन्साय ही कला जपानमध्ये विस्तारित झाली असली तरी आता ती मनाला आनंद देणारी, मनाला मोह पाडणारी आकर्षक कला भारतासह जगातील अनेक देशांत लोक मान्यतेस पात्र झाली आहे. मोठ्या झाडाची प्रतिकृती छोट्या झाडात निर्माण करण्यासाठी बोन्साय ही एक जिवंत कला आहे. बोन्साय करणे फार अवघड आहे असे नाही. परंतु त्यासाठी चिकाटी पाहिजे. या पुस्तकात अगदी नवख्यानेही बोन्साय कसे करावे, त्यासाठी झाड कोठून मिळवायचे, सुरूवात कधी करायची, झाडाची छाटणी, वळण कसे राखायचे इ. सर्व माहिती दिली आहे. पानासाठी, फुलासाठी, फळासाठी बोन्साय करायचे असते. त्यानुसार कोणती झाडे निवडायची त्या अनेक प्रकारच्या झाडांची माहिती या पुस्तकात आहे.
बोन्सायसाठी लागणारी भांडी, माती, इतर साहित्य कोणते व कसे असते ही माहिती येथे आहे. बोन्सायची कोणती व कशी काळजी घ्यावी, त्यावरील रोग - किडींचे नियंत्रण कसे करावे, भांडे कसे बदलावे अशा अनेक गोष्टी येथे वाचावयास मिळतात. बोन्सायसाठी उपयुक्त अशा 73 झाडा झुडुपांची सविस्तर माहिती येथे दिली आहे, हे या पुस्तकाचे वैशिष्ठ्य आहे.