Summary of the Book
दिलीप प्रभावळकर
आज सर्वत्र गाजत असलेलं एक बहुचर्चित
नाव. नाटक, चित्रपट, दूरदर्शन, आकाशवाणी
या विविध क्षेत्रांत एकाच वेळी लीलया वावरत
असलेला हा अनुभवसंपन्न कलाकार.
रंगमंचावर ते जेवढ्या सहजतेनं वावरतात,
तितक्याच सहजतेनं ते लेखणीही चालवतात.
ते मोजकंच लिहितात; पण जे काही लिहितात,
ते अफलातून असतं. त्यांची स्वतःची अशी
विनोदाची खास शैली आहे. त्या खुमासदार
शैलीनं नटलेल्या त्यांच्या एकांकिका वाचत
असतानाच डोळ्यांसमोर जिवंत दृश्य उभं
करतात.
तुमच्या लक्षात येईल, की य एकांकिका
वाचताना आपण सारखे खुदखुदत राहतो