Shashikant Oak
22/09/2012
हे पुस्तक पुर्वी विविध नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संग्रह आहे. लेखांचे विषय वेगवेगळे असले तरी सर्वांचे सूत्र विज्ञान हेच आहे. अध्यात्मात विज्ञान कुठे आले? असा काही जणांना प्रश्न पडेल. विज्ञान म्हणजे पाश्चात्यांचे आधुनिक भौतिक विज्ञान अशी अनेकांची समजूत आहे. पण वस्तुतः सत्यशोधनाच्या पद्धतीला विज्ञान असे म्हणतात. या अर्थाने विज्ञान शब्द आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी उपनिषदातून फार पुर्वीचा वापरला आहे. अतींद्रिय सत्य बुद्ध्यातीत असूनही भौतिक विज्ञानाने त्याचे ज्ञान बुद्धिला (तात्विक व अप्रत्यक्ष रीतीने का होईना) होते, म्हणून भौतिक जगाचा वैज्ञानिक अभ्यास (भौतिक संशोधन) हा अध्यात्मिक सत्याच्या अनुभवासाठी आवश्यक आहे असे प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांचे या पुस्तकातून प्रतिपादन आहे. त्यांचे सर्व लेख अशा संगतवारीने आहेत की ते पुस्तकाच्या शीर्षकाला न्याय देतात. (भाग 2पुढे वाचा)