Summary of the Book
आधुनिक जीवनातील अर्थपूर्ण अनुभवांचा कलापूर्ण वेध घेणाऱ्या कथाकाराच्या अलीकडच्या काही कथांचा हा संमिश्र कथासंग्रह. औद्योगिक परिसर वृत्तपत्रांचे क्षेत्र, युवकांच्या मनातील असंतोष, आणि स्त्रीजीवन येथे आकारणाऱ्या अनुभवांचा सामाजिक संदर्भात वेध घेणे हे ह. मो. मराठे यांचे वैशिष्ट्य.
या संग्रहातील कथांत कधी ते वृद्धांच्या मनात डोकावताना दिसतील, कधी कामगार नेत्याच्या, कधी शेत-मजुराच्या, कधी झोपडपट्टीतील निराधारांच्या कधी हिंसाचक्रात अडकलेल्या युवकाच्या, कधी एकाद्या विचारवंत लेखकाच्या, कधी सामाजिक असंतोषाच्या ज्वालामुखीत ज्याच्या जाणिवांना भावळ आलीय अशा कंपनी एक्झिक्युटिव्हच्या प्रत्येक कथेचा विषय निराळा असला तरी सर्वत्र जाणवतो तो ‘हमोऽच’