Summary of the Book
प्रवास माणसाइतकाच प्राचीन आहे. प्रवासाची साधनं उपलब्ध नव्हती तेव्हाही माणसाची पावलं प्रवासीच होती.
माणसाचं कुतूहल, जीवनप्रीती, साहसेच्छा आणि अनुभवोत्सुक मन त्याला स्वस्थ बसू देत नाही.
प्रवासात नाना प्रकारची माणसं, त्यांची घरदारं, गावं, संस्था, वास्तू, संगीत, भौगोलिक
वैचित्र्यं यांचे ठसे मनावर उमटतात.
प्रवासाची ओढ प्रत्येक माणसालाच असते. सर्वच क्षेत्रांतील माणसं वेगवेगळ्या प्रयोजनांनी देशाविदेशात
प्रवास करत असतात. या प्रवासात नवलाईचं खूप काही घडतं. अचानक संकटं उद्भवतात; पण परकी
माणसं मदतीला धावून येतात. भाषिक अडचणी येतात; पण शब्दांपलीकडची हावभावांची, खाणाखुणांची
भाषा भाव प्रकट करते. जीवनमरणाच्या सीमेवरचा चित्तथरारक क्षण कधी उद्भवतो तर कधी फजिती
होते; पण स्वत:लाच खदखदून हसावंसंही वाटतं. आठवणींची संदूक प्रवासी दिवसांत अनमोल रत्नमाणकांनी
गच्च भरते.
`आठवणी प्रवासाच्या’ हे पुस्तक म्हणजे अशीच एक प्रवासी स्मृतींची संपन्न संदूक आहे. डॉक्टर, छायाचित्रकार, गायिका, उद्योजिका, हवाईदलातील कप्तान, लेखक, पत्रकार, पर्यटन-संस्थाचालक, चार्टर्ड अकाऊंटंट, राजकारणी नेता अशा विविध क्षेत्रात संचार करणारी मंडळी इथं त्यांच्या प्रवासी
स्मृती जागवताहेत.
प्रिय वाचक, मान्यवरांच्या हातात हात घालून तुमचाही मन:प्रवास सुंदर होऊ दे. शुभास्ते पंथान: सन्तु।