Summary of the Book
नजरबंद’ ही एका सामान्य चित्रकाराची असामान्य कहाणी आहे.
या कादंबरीचे लेखक श्री. ज्ञानेश्वर नाडकर्णी हे गेली पंचेचाळीस वर्षे मुंबईच्या कलाजगतात वावरत आहेत. कलासमीक्षक म्हणून गेली 20-22 वर्षे ते मुंबईच्या प्रमुख वृत्तपत्रांतून लेखन करीत आहेत. आपल्या वैचित्र्यपूर्ण अनुभवांना स्वत:मधल्या कथाकाराच्या कल्पकतेची जोड देऊन त्यांनी ह्या कादंबरीचे कथानक रचलेले आहे.
‘नजरबंद’मध्ये सर्वसाधारण वाचकाला ओळखीचे चेहरे दिसणार नाहीत, परंतु जे या कलाजगताचा भाग आहेत त्यांना तीत बरेच काही खोचक आढळेल. ‘दोन बहिणी’ ‘कोंडी’ आणि ‘चरित्र’ या कादंबऱ्यांनंतर प्रसिद्ध होणारी ‘नजरबंद’ ही कादंबरीही श्री. नाडकर्णी यांच्या साहित्यात निश्चितच मोलाची भर घालील.