Summary of the Book
रोज घडणा-या गोष्टी; पाण त्याकडेही निराळ्या नजरेनं पाहण्याची दृष्टी भा. ल. महाबळ यांच्या या कथासंग्रहातून मिळते. आपल्या अवतीभोवती अनेक गोष्टी घडत असतात. आपल्याला त्याचं गांभीर्यही समजत असतं. मात्र अल्प काळात आपण ते विसरून जातो; परंतु समाजावर त्याचे परिमाण कायमस्वरूपी राहतात.
'हिट अँड रन केस,' राजकीय लागेबांध्यामुळे पडणारा निष्पापांचा बळी, किरकोळ कारणांमुळे होणा-या आत्महत्या, बुवाबाजीचे बळ, वृद्ध माता - पित्याचे हाल, एकाकी आयुष्य, लिव इन रिलेशनशिप, बाळगुन्हेगारी, आशा अनेक विषयांना या कथा स्पर्श करतात. समाजातील विविध स्थरातील माणसे, त्यांचे स्वभावविशेष यांचे दर्शन कथांतून होते. समाजाच्या सखोल निरीक्षणातून उतरलेले हे विश्व वाचनीय आहे.