Summary of the Book
महाराष्ट्रात मोठी संत परंपरा आहे. तिची महती वर्षानुवर्षांपासून वर्णिली जाते. तशीच परंपरा इतर राज्यांतही आहे, पण त्याची माहिती आपल्याला नसते. याचे मुख्य कारण म्हणजे भाषेचा अडसर. अन्य भाषांतील संत साहित्याचा अनुवाद झाल्याखेरीज तेथील संत कोण, त्यांचे कार्य आपल्यापर्यंत पोचत नाही. मानव धर्माचा प्रचार व प्रसार करणारे प्रसिद्ध बंगली संत लालन फकीर यांचे चरित्र 'मोनेर मानुष'द्वारे मराठीत अनंत उमरीकर यांनी उपलब्ध करून दिले आहे. सुनील गंगोपाध्याय यांची ही कादंबरी त्यांनी अनुवादित केली आहे. हिंदू धर्मात जन्मलेले व नंतर मुस्लीम धर्माशी संबंध आलेले लालन साई यांनी सर्व धर्मांपेक्षा मानव धर्माचा पुरस्कार केल्याने दोन्ही धर्मांत त्यांना मानहानी पत्करावी लागली. दलितांनी त्यांना आपले मानले. त्यांनी रचलेल्या गीतांची संख्या हजाराच्या घरात आहे. या कादंबरीतून त्यांचे जीवन, कार्य, त्यांचे व्यक्तिमत्व उभे राहिले आहे.