Summary of the Book
श्री . नारायण राणे यांच्या राजकीय प्रवासातील सगळी नाट्यमय वळणे मी जवळून पाहिली आहेत. कोणत्याही वळणावर त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत स्नेहाचेच राहिलेले आहेत. त्यांचा आक्रमकपणा सर्वपरिचित आहे.तळागाळातून आलेल्या व्यक्तींच्या ठायी असा आक्रमणपणा असतोच. पण, सामान्य माणसांबद्दल असलेली आत्मीयता आणि अनुकंपा भरभरून असते. ती दिसण्यासाठी व्यक्तीच्या जवळ जावे लागते. नारायणराव नावाच्या फणसातले मधुर - रसाळ गरेदेखिल त्यांच्या सानिध्यात गेल्याशिवाय कळत नाहीत.
कोणतीही कौटुंबिक , राजकीय पार्श्वभूमी नसताना घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना सामाजिक ओळख नसताना बेताची असताना सामाजिक ओळख नसताना राजकीय क्षेत्रात स्वत:च्या कार्यक्षमतेच्या जोरावर कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या नेत्यांमध्ये नारायण राणे यांचा आवर्जून उल्लेख करतो. त्यांच्या झंझावाती आयुष्याला माझ्या शुभेच्छा !