Summary of the Book
दारू, गांजा, अफू, कोकेन, गर्द आदी अंमली पदार्थ सेवन करण्याची सवय समाजाच्या सर्व थरांत दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणावर पसरत चालली आहे.
या नशादायक मादक वस्तूंच्या दुष्परिणामाबद्दल जनतेत अज्ञान कायम राहिले तर व्यसनाधीन व्यक्तिंची संख्या बेसुमार होऊन परिणामी विद्यमान युवा पिढी आणि उदयास येणारी नवी पिढी अधोगतीच्या गर्तेत गेल्यावाचून राहणार नाही.
यासाठी `मादक वस्तूंचे ज्ञानच व्यसन घालविण्याचा पाया होय’ हे मूलतत्त्व गृहीत धरून साधारणपणे वापरात असणार्या सर्व मादक व व्यसन जडविणार्या पदार्थांची सर्वांगीण माहिती या पुस्तकात एकत्रित केली आहे.
ह्या गंभीर धोक्याची युवा पिढीला जाणीव करून देणे आणि जे काही अजाणता व्यसनाधीन झालेले असतील त्यांच्या व्यसनमुक्त होण्याच्या प्रयत्नाला मार्गदर्शन करणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे.