Summary of the Book
डी. लॅकमन पॅट हे नाव वाचले की एका अमराठी माणसाविषयी कथा वाचावी लागेल काय, असा प्रश्न पडेल. पण दत्तात्रेय लक्ष्मण पटवर्धन या मराठी माणसाचीच साहसकथा कॅप्टन राजा लिमये यांनी 'साहसी वैमानिक' या पुस्तकात कथन केली आहे. पटवर्धन यांना शालेय अभ्यासात गती नसल्याने त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. ते मग रेल्वे इंजिनचालक झाले. त्यानंतर व्यापारी नौकेचे कप्तान बनले. पहिल्या महायुद्धात त्यांनी मशिनगन घेऊन युद्ध केले आणि ब्रिटिश रॉयल एअर फोर्समध्येही सामील झाले. अशा या व्यक्तिमत्त्वाची ओळख कॅप्टन लिमये यांनी सुरेखरीत्या करून दिलेली आहे.