Summary of the Book
माहिती तंत्रज्ञान आणि संगीत दोन वेगळ्या क्षेत्रातील माणसं, प्रसंग आणि घडामोडींचा वेध बापू करंदीकर यांनी या कादंबरीतून घेतला आहे. मानववंशाच्या दुव्यांना शब्दांत पकडणारा हा आदिबंध आहे. एखादं विशिष्ट सुख, यश अथवा पद मिळविण्यासाठी माणसं धडपड करीत राहतात आणि अखेर हाती येतं, ते ध्येय आणि आशा-निराशांच्या खेळानं व्यापलेलं आयुष्य आहे. कॉर्पोरेट जगातील माणसं, त्यांचे डाव-प्रतिडाव, तत्वांवर मारलेली काट आदींबरोबरच संस्कार, प्रेम, विवाह किंवा अगदी अलीकडील लिव्ह-इन-रिलेशनशिप या विषयांचाही ते वेध घेतात. लेखनाच्या ओघात कविताही येतात. अलीकडील काळातील संदर्भांमुळे कादंबरीत ताजेपणा आला आहे.